hadapsar मध्ये कार बाजार दुकानात चोरी, २४ तासांत चोरटा अटक!

0

hadapsar मध्ये कार बाजार दुकानात चोरी, २४ तासांत चोरटा अटक!

हडपसर, पुणे: दि. ३१/०३/२०२४ रोजी रात्री, हडपसर (hadapsar news)येथील चिंतामणी मोटर्स नावाच्या कार बाजार दुकानात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दोन गाड्या चोरल्या होत्या. या चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, गुन्हे शाखा युनिट-५ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि त्यांच्या टीमने त्वरित तपास सुरू केला.(hadapsar news today live)

२४ तासांत आरोपी अटक:

युनिट-५ कडील पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना बातमी मिळाली की, पवन आलकुंटे नावाचा इसम त्याचे मित्रासोबत चोरीच्या गाड्या वापरत आहे. या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवाळेवाडी, सोलापुर रोड येथे नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदीमध्ये चोरीच्या गाडीसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

आरोपी आणि चोरीचा माल:

पकडलेल्या आरोपींची नावे पवन शंकर अलकुंटे (वय २०) आणि त्याचा मित्र (विधीसंघर्षीत बालक) अशी आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या दोन्ही गाड्या (एकूण किंमत ₹१०,५०,०००/-) जप्त करण्यात आल्या आहेत.

तपास आणि पुढील कार्यवाही:

पोलिसांनी आरोपी पवन अलकुंटेला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे, तर विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *