पिंपरी चिंचवड

Pimpri-Chinchwad: कोयत्याने मारहाण करून पैसे पळवले ,गाड्यांच्या काचा फोडल्या !

पिंपरीत धक्कादायक घटना: कोयत्याचा धाक दाखवून मारहाण, लूट व दहशत

Pimpri-Chinchwad: दिनांक १६ जुलै २०२४ रोजी सकाळी ५:४० वाजता (Pimpri chinchwad news marathi) पिंपरीतील आशोक थेटरच्या मागे आणि धनराज ट्रेडर्सच्या समोर एक धक्कादायक घटना घडली. मलीक्काअर्जुन चंद्रशेखरख्या साली (वय ३६ वर्ष, व्यवसायी) यांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून लूट करण्यात आली.(Pimpri Chinchwad news)

फिर्यादी मलीक्काअर्जुन साली हे साई जिममध्ये व्यायाम करून खाली येऊन थांबले असताना, दुचाकीवर आलेल्या तीन आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना उलट्या कोयत्याने व हाताने मारहाण करून जखमी करण्यात आले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या खिशातील पाकिटातील ४५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच, रोडवर पार्क केलेली चारचाकी गाडीची काच फोडून नुकसान केले.

ही धक्कादायक घटना यावरच थांबली नाही. आरोपींनी रोडवर पार्क केलेल्या इतर तीन गाड्यांच्या काचा देखील कोयत्याने फोडून दहशत माजवली.

,

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *