Online fraud in Pimpri : कुरियर कंपनीतून बोलत असल्याचं भासवून, १ १ लाख रुपयांना गंडवले !
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – कुरियर कंपनीतून बोलत असल्याचं भासवून एका अज्ञात व्यक्तीने पिंपरी-चिंचवडमधील एका ५१ वर्षीय व्यक्तीची तब्बल ११ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. संत तुकारामनगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Online fraud in Pimpri
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद नागनाथ क्षिरसागर (वय ५१) यांना १८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या काळात दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून (७००५८१६२९८, ८७९४०१८९०७) वारंवार फोन येत होते. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण ब्लू डार्ट कुरियर सर्व्हिसमधून बोलत असल्याचं सांगितलं.
आरोपीने फिर्यादींना सांगितलं की, त्यांच्या नावाने मुंबईहून बायलंडसाठी एक पार्सल बुक करण्यात आलं आहे आणि त्या पार्सलमध्ये ड्रग्ज, लॅपटॉप, पासपोर्ट आणि काही कपडे आहेत. एवढंच नाही तर, आरोपीने फिर्यादीचा संबंध मनी लॉन्ड्रिंगशी असल्याचं भासवून त्यांना धमकावलं.
या धमक्यांना घाबरून फिर्यादींनी आरोपीने दिलेल्या फेडरल बँकेच्या खात्यावर (क्रमांक १०३७२०००१४९५४) ११ लाख रुपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच फिर्यादींनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी बी.एन.एस. कलम ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस संबंधित मोबाईल नंबर आणि बँक खात्याच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.