पुणे : पी. ई. एस. मॉडर्न लॉ कॉलेज, पुणे येथील संशोधन विद्वान डॉ. नीलम दिघे यांनी कायद्यात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी आपले संशोधन कार्य डॉ. शहािस्ता इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. बुधवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
विशेष म्हणजे, ही मॉडर्न लॉ कॉलेजच्या पीएच.डी. रिसर्च सेंटरमधून प्रदान झालेली पहिली पीएच.डी. असल्याने हा क्षण महाविद्यालयासाठी आणि संपूर्ण शैक्षणिक समुदायासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयाने शैक्षणिक उत्कृष्टतेच्या नव्या वाटा उघडल्या आहेत. डॉ. नीलम दिघे यांच्या यशामुळे संशोधन क्षेत्रात महाविद्यालयाचा गौरव अधिक वृद्धिंगत झाला आहे.
महाविद्यालयाचे चेअरमन गजानन एकबोटे सर,प्राचार्य,प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी यांनी डॉ. दिघे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधन आणि शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.




