पी.एम.पी.एम.एल.राष्ट्रवादी कामगार युनियनची बैठक संपन्न.

0



पिंपरी:-पीएमपीएमएल राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन पिं.चिं.विभागाची बैठक पिंपरी कार्यालयात प्रमुख सरचिटणीस श्री.सुनिल नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी संघटनात्मक कामकाजावर चर्चा करण्यात आली तसेच संघटनेच्या वतीने सभासद नोंदणी अभियान राबविणेबाबत सर्व पदाधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच सेवकांना दैनंदिन कामकाजात भेडसावणारे प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर देण्यात यावा,यावेळी काही कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी नलावडे यांच्या पुढे मांडले असता त्यांनी याबाबत सर्व कर्मचारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले.व आपल्या तक्रारी संबंधित डेपोतील अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करुन त्यांची एक प्रत संघटनेच्या पदाधिकारी यांच्या कडे सादर करावी.

सेवकांच्या तक्रारी अर्जावर तातडीने कार्यवाही करुन योग्य तो निर्णय घेणेबाबत युनियनच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील. कुठल्याही कामगारांवर अन्याय होऊ नये यासाठी युनियन सातत्याने प्रयत्नशील आहे.पीएमपीचे सीएमडी साहेब हे कामागारांच्या मागण्याबाबत सकारात्मक असुन त्यांनी संघटनेकडे वेळ मागितला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले,कामगारांनी निःसंकोचपणे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे तसेच उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही सरचिटणीस सुनिल नलावडे यांनी केले आहे.


तसेच पिंपरी हेडक्वाॅटर-2 चे प्रमुख रमेश अर्धाले सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी संघटनेच्या अध्यक्षपदी राजकुमार डोळस याची सर्वानुमते निवड करण्यात आली.डोळस यांनी हेडक्वार्टर-२ ची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पिं.चिं.विभागाच्या वतिने पुष्पगुच्छ देवुन पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.यावेळी युनियनचे सरचिटणीस सुनिलभाऊ नलावडे,गणेश‌भाऊ गवळी,(संचालक:-पिं.चि.मनपा सेवक पतसंस्था) युनियनचे जेष्ठ मार्गदर्शक रामभाऊ कोळपे,रमेश अर्धाले,यांच्यासह राष्ट्रवादी कामगार युनियन पिं. चिं.विभागचे उपाध्यक्ष:- दिपकभाऊ गायकवाड,कार्याध्यक्ष:- संतोषभाऊ शिंदे, राजकुमार डोळस (अध्यक्ष-हेडक्वार्टर-२) ,योगेश चौधरी(अध्यक्ष-भोसरी),आनंद महांगडे ,संदिप कोंढाळकर‌(अध्यक्ष-पिंपरी) प्रफुल्ल शिंदे(अध्यक्ष-निगडी),रामदास गवारी (मा.अध्यक्ष,आदिवासी संघटना),निलेश शेलार ,राजेश पठारे,सुभाष आदक,सुभाष सातपुते,दत्तात्रय कोळेकर ,शरद पोतदार,संतोष चव्हाण,बाळासाहेब मुळुक, आकाश तिवारी,धनाजी वनवे,पिंन्टु साळुंखे,जितु पोरे, अविनाश घोगरे,अमोल घोजगे,संजय जयस्वाल,पंढरी पोटफोडे,आदी पदधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *