PM Kisan : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणार असून, यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाखो शेतकऱ्यांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. गेल्या अर्थसंकल्पातही शेतीला प्राधान्य देण्यात आले होते. या वर्षीच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ आणि पीक विमा योजनेत सुधारणा यासारख्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ (Budget 2025)
सरकार किसान सन्मान निधीच्या (PM-KISAN) हप्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे. सध्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, परंतु 2025 च्या अर्थसंकल्पात ही रक्कम 8,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. संसदेच्या स्थायी समितीने ही रक्कम 12,000 रुपये करण्याची शिफारस केली होती. जर ही घोषणा झाली, तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
पीक विमा योजनेची व्याप्ती वाढण्याची शक्यता
या अर्थसंकल्पात पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात येईल, असा अंदाज आहे. कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकतेच या योजनेचे फायदे नमूद केले होते. संसदेच्या स्थायी समितीने दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी युनिव्हर्सल क्रॉप इन्शुरन्स स्कीम लागू करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Google News वर फॉलो करा: पुणे सिटी लाइव्ह
WhatsApp चॅनल जॉईन करा: पुणे सिटी लाइव्ह WhatsApp चॅनल