लाडकी बहीण योजनेचे मराठीतून भरलेले फॉर्म बाद होणार का? जाणून घ्या!
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत राज्यातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे आणि मराठीतून अर्ज भरले आहेत. या संदर्भात महिलांच्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत की मराठीमधील अर्ज नामंजूर होणार का?
या शंकेबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत. त्यामुळे महिला यांनी काळजी करू नये आणि मराठीमधून अर्ज करणे सुरु ठेवावे.
मंत्री तटकरे यांच्या या घोषणेमुळे मराठीतील अर्जदार महिलांचे मनोबल वाढेल आणि त्यांना या योजनेचा फायदा मिळवता येईल.