पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट: या भागात विजांसह अतिवृष्टीचा इशारा !

0

पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा

Imageपुणे: आज दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील २४ तासांत पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Railway Apprentice :नोकरीची सुवर्णसंधी, 10वी, 12वी आणि ITI असलेल्यांसाठी नोकरी पक्की!

 

प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, सुरक्षित स्थळी राहावे, आणि नदीकाठच्या भागात विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, वीज उपकरणांचा वापर करताना काळजी घेण्याची आणि पाण्याच्या तळाला जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनं नेऊ नयेत अशी सूचना करण्यात आली आहे.

 

शहरातील संबंधित यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असून, नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तत्पर राहण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *