पुणे :वीर धरणाच्या सांडव्यानरुन विसर्गाची शक्यता, नागरिकांनी खबरदारी घ्यावी
वीर धरणाच्या सांडव्यानरुन नीरा नदी पात्रात पाऊस सुरू राहिल्यास आणि येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग करण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता दि. म. डुबल यांनी दिली आहे.
त्यानुसार, नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये याची काळजी घ्यावी. प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील अपडेटसाठी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे.