पुणे: लवासा हिल सिटी येथे बुधवारी दरड कोसळल्यामुळे दोन घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेत तीन ते चार जण बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने तत्काळ शोध व बचाव कार्य सुरू केले असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवांच्या संयुक्त प्रयत्नांनी, सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत बेपत्ता व्यक्तींना सुखरूपपणे शोधण्याची प्रार्थना ईश्वरचरणी करण्यात येत आहे. प्रशासनाने नागरिकांना धीर देत, आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रभात/पुणे