उंड्री, पुणे – स्टॉक ट्रेडिंगमध्ये(Stock trading) नफा मिळवता येईल असे आमिष दाखवून एका ४८ वर्षीय महिलेला २२,०५,००० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फिर्यादी महिला उंड्री, पुणे (Undri, Pune)येथे राहतात.
कोंढवा पोलीस स्टेशन(Kondhwa Police Station)मध्ये गुन्हा क्रमांक ६१९/२०२४ नोंदविण्यात आला असून, भादंवि कलम ४२० आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क) (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने त्यांना स्टॉक ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवता येईल असे सांगून आमिष दाखवले. त्यानंतर, आरोपीने ऑनलाइन लिंक पाठवून फिर्यादीला विविध खात्यांवर पैसे जमा करण्यास भाग पाडले. आरोपीने KKRCA नावाच्या अॅप्लिकेशनवर फिर्यादीला भरघोस नफा मिळत असल्याचे भासवून, कोणताही परतावा न देता फिर्यादीची एकूण २२,०५,००० रुपयांची फसवणूक केली आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या आरोपी अटक नाही. पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.