हडपसर, पुणे (दि. २५ मे २०२४): हडपसर (Hadapsar lawyer) परिसरातील मांजरी फार्म (manjri farm) येथे एका बांधकाम सुरु असलेल्या खोलीत खूनाची घटना घडली आहे. या घटनेत संतोष भास्कर आडसुळ (वय ४१ वर्षे) यांचा आरोपी राहुल दत्तात्रय घुले (वय ४१ वर्षे) याने खून केला आहे.(Pune News)
फिर्यादी भास्कर आडसुळ (वय ६४ वर्षे, रा. मांजरी हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राहुल दत्तात्रय घुले (रा. मांजरी फॉर्म मोरे वस्ती, काळुबाई मंदिराशेजारी ता. हवेली जि. पुणे) याने, एक महिन्यापुर्वी फिर्यादी यांचा मुलगा संतोष आडसुळ यांच्यासोबत झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून, संतोष यांना हाताने मारून जमिनीवर आपटून ठार मारले.
घरात बसून कमाई! बारामतीमध्ये वाढते पॅकिंगचे काम
ही घटना दि. २५ मे २०२४ रोजी रात्री ८:३० वाजता मांजरी फार्म, शेवाळवाडी, मांजरी हडपसर, पुणे येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. ८५७/२०२४, भादवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती मंगल मोढवे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी राहुल घुले याला अटक करण्यात आली आहे.
Travel Insurance Jobs : पुण्यात प्रवास विमा क्षेत्रात नोकऱ्यांची संधी !
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत संतोष आडसुळ यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, ही हत्या पूर्वनियोजित आहे आणि आरोपीने या घटनेची पूर्वतयारी केली होती. पोलिसांनी या दृष्टीनेही तपास सुरु केला आहे.