
शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची तक्रार राज्य शासनाचा कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 9822446655 या क्रमांकावर थेट व्हाट्सअप द्वारे करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे द्यावी, असे आवाहन केले आहे. सदर केंद्र चालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुंडे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांनी शक्य असेल त्या पुराव्यासह तक्रार करावी, जेणेकरून कारवाई अधिक प्रभावीपणे होऊ शकेल. हे केंद्र चालक शेतकऱ्यांना फसवून आगाऊ पैसे मागत असल्याचे आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले.