Diwali Bonus Car Gift :हरियाणातल्या पंचकुलातील फार्मा कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट म्हणून चक्क कार भेट दिली आहे. मिट्सकार्ट असं या कंपनीचं नाव आहे. विशेष म्हणजे ज्यांना दिवाळी गिफ्ट मिळालंय त्यात एका ऑफिस बॉयचाही समावेश आहे.
कंपनीचे मालक संदीप गर्ग म्हणाले की, “आमच्या कर्मचाऱ्यांची मेहनत आणि प्रमाणिकपणा पाहून मला खूप आनंद झाला. त्यामुळे त्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून कार देण्याचा निर्णय घेतला. आम्हाला आशा आहे की, या गिफ्टमुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्यांना दिवाळी अधिक आनंदाने साजरी करता येईल.”
कर्मचाऱ्यांना कार मिळाल्यानंतर ते खूप आनंदी झाले आहेत. त्यांनी कंपनीचे मालक आणि व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
या घटनेमुळे पंचकुलात चर्चेला उधाण आले आहे. अनेक लोक या कंपनीच्या मालकाच्या निर्णयाचे कौतुक करत आहेत.