Pune Gold :सोनेदरात १५ दिवसांनंतर वाढ; दसरा-दिवाळीतही वाढीचाच कल सोने दरात १५ दिवसांनंतर वाढ; दसरा-दिवाळीतही वाढीचाच कल
मुंबई, 10 ऑक्टोबर 2023 – सराफा बाजारात सोनेदरात आज १५ ते १६ दिवसांनंतर एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ३०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. आज सोन्याचा भाव २२ कॅरेट ५९,९२२ रुपये प्रति तोळा आणि २४ कॅरेट ६१,४२२ रुपये प्रति तोळा इतका आहे.
कुठल्याही विशेष कारणाशिवाय सोनेदरात आज ही वाढ झाली आहे. मात्र, दसरा, दिवाळी सणांच्या काळातही सोने दरात वाढीचाच कल राहील, असे सराफा बाजारातील व्यावसायिकांनी सांगितले.
याशिवाय, हमास व इस्त्रायल यांच्यात निर्माण झालेल्या युद्धस्थितीचाही सोने दरावर परिणाम झाला असल्याचे सांगितले जात आहे. युद्धस्थितीमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, सोने हे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिले जाते. त्यामुळे सोने दरात वाढ झाली आहे.
सोनेदरात वाढ झाल्याने सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फटका बसला आहे.