‘प्लॅगारिझम सॉफ्टवेअरचा रिपोर्ट पीएच.डी.संशोधक विद्यार्थ्यांना देणे अनिवार्य
पुणे,दि.9 डिसेंबर 2023: पीएच.डी.(PHD) करत असलेल्या विद्यार्थ्यांच संशोधन व शोधप्रबंध उत्तम व अचुक होण्यासाठी प्लॅगॅरिझम सॉफ्टवेअर रिपोर्ट विद्यार्थ्यांना तयार करावा लागणार आहे. शोधप्रबंधात होणाऱ्या चोर्य ला चाप बसवण्यासाठी केंद्रशासनाच्या उपक्रमाअंतर्गत हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अधिक काळजी घेऊन आपला शोधप्रबंध तपासुन घ्यावा लागणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात Urkhand व Trunitin या सॉफ्टवेअर चा उपयोग करून शोधप्रबंध जमा करून घेतला जात होता परंतु आता संशोधनात होणाऱ्या साहित्यिक चोरीला रोख लावण्यासाठी प्लॅगारिझम सॉफ्टवेअर रिपोर्ट बंधनकारक असणार आहे. INFLIBNET प्रकल्पाअंतर्गत केंद्र शासनाच्या शोध शुद्धी उपक्रमानुसार ड्रिलबीट एक्सट्रेम प्लॅगारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर 1नोव्हेंबर 2023 पासून लागू करण्यात आले आहे.