Animal Movie Review Marathi : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित अँनिमल वृत्तीच दर्शन घडवणारा ‘अँनिमल!

Animal Movie Review Marathi  ‘कबीर सिंघ’ नंतर संदीप रेड्डी वांगा यांचा ‘ऍनिमल’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर चांगलाच धुमाकूळ गाजवत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सगळीकडे ‘Boycott Bollywood’ ची लाट पसरली होती पण. चित्रपटगृहांपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे चाहते वळत होते पण परत एकदा बॉलीवूड चित्रपटांनी डोकं वर काढले आहे असं म्हणायला हरकत नाही. शाहरुख खानच्या ‘जवान’ नंतर आता रणबीर कपूरचा ‘अँनिमल’ सध्या बहुचर्चित आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाई अवघ्या सात दिवसात 25.कोटी एवढी आहे.

अँनिमल सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना व तृप्ती डिमरी हे कलाकार दिसुन येतात.या चित्रपटानं धुमाकुळ जरी घातला असला ताटी याच कथन पुरुषउवाच व जुन्या पिढींना बढावा देणारे आहे.या चित्रपटाची कहाणी मुल व वडील यांच्या भोवती फिरते.श्रीमंतीत वाढलेल्या मुलाला वडिलांकडून अपेक्षित प्रेम न मिळाल्याने तो मिळेल त्या पद्धतीने त्याच वडिलांवर असलेले प्रेम व्यक्त करतो.

या चित्रपटात रणबीरच्या अनेक अँनिमल वृत्तीचं दर्शन घडते. बर अँनिमल शब्द का तर ज्याप्रमाणे प्राणी त्यांच्यावर झालेल्या हल्याचा बदला अगदी निर्भिडपणे घेतात तर त्यांची निडर वृत्ती म्हणजे अँनिमल. चित्रपटाच्या सुरुवातीला रणबीरच्या बहिणीची कॉलेजमध्ये काही मुलं तिची छेड काढतात त्यावेळी स्कूलयुनीफार्म मध्ये असलेला रणबीर कपुर कॉलेजमध्ये बंदूक घेऊन जातो व त्या सगळ्यांना चांगलच चोख उत्तर देतो. या सिनमध्ये भावाचं बहिणीवर असलेले प्रेम व काळजी दिसुन येते पण एका स्कूलयूनिफार्म मध्ये असलेल्या मुलाच्या हातात बंदूक असणे कुठेतरी याच समर्थन करत नाही. अशा प्रकारच्या अनेक हिंसक गोष्टींना या चित्रपटात वाव दिली आहे. आजही युवक – युवती आपल्या आवडत्या नायक नाईकांना आदर्श मानतात. चित्रपटांत दाखवलेल्या पेहराव्यापासून तर प्रत्येक गोष्ट आत्मसात करतात, त्यांचे कॅरेक्टर मनात छाप सोडुन जाते. मान्य आहे चित्रपट म्हंटला कि, मारहाण , रोमांस या सगळ्या गोष्टी आल्या पण अँनिमल मध्ये पुरुषवृत्तीला जास्त प्राधान्य दिले आहे. स्त्रियांच्या लैगिकतेविषयी ज्या प्रकारचे बोल बोलले आहेत त्यावर अनेक प्रेक्षकांनी टीका केली आहे. जेव्हा रणबीर कपूर रश्मिकाला लग्नासाठी मागणी विचारत असतो तेव्हा दोघांमध्ये खुप असामान्य संवाद झालेला दाखविला आहे.त्यात तो पूर्वीच्या काळात स्त्रिया कशा आपला वर निवडायच्या ते सांगतो. ‘अल्फा’ सारखे शब्द वापरून स्त्रिया त्या काळातही कमकुवत होत्या आणि आजही आहेत म्हणुन त्यांच्या सरंक्षणासाठी अल्फा सारख्या पुरुषाची गरज आहे हे तिला पटवून देतो. यामुळे समाजातील पुरुषाचे समाजातील वर्चस्व दाखविले आहे.

सुरुवातीला लग्नाआधी रश्मिकासाठी असलेले प्रेम दिसुन येते पण लग्नानंतर त्याच्या वागण्यात झालेला बदल विचारात पाडणारा आहे. अल्फा सारखे उदाहरण देऊन तिला प्रेमात पाडतो व दुसरीकडे तोच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करतो. त्याच्यावर झालेल्या एका हल्यात रणबीर जखमी होतो त्यामुळे मानसिक आणि शारीरिक तो खूप कमजोर होतो पण या सगळ्यांचा राग व्यक्त करण्यासाठी तो रश्मिकाला यातना देताना दिसतो. या सिनमुळे स्त्रिया आजही अशा हिंसक वृत्तीच्या बळी पडतात तेही समाजमाण्य पद्धतीनं याच खरंच दुःख होत. तसेच लग्नानंतर त्याचे विवाहबाह्य संबंध व तिच त्याला परत स्वीकारणं याच पुष्टीकरण अगदी चोख पद्धतीने केलं आहे. बॉबी देओलचे पण बरेच सिन रणबीरपेक्षा हिंसक दाखवले आहेत म्हणजे नायकापेक्षा खलनायक कसा भयानक दाखवता येईल याची काळजी घेतली आहे. ऐकूनच या चित्रपटामध्ये हिसंक दृश्य व बोल्ड सिनइतकेच अश्लिल भाषाही वापरली आहे. स्त्रियांविषयी एक पडती बाजु दाखवली आहे. दिवसेंदिवस नायकाच्या आकृतीला एक वेगळे वळण मिळत आहे. बाकी रणबीर कपूर चा लुक, गाड्या, ऐशोआराम तरुणांना भुरळ पाडणारा आहे, पण अशा भूमिकांना आदर्श मानुन समाजातील हिंसेला बढावा मिळु शकतो.

Leave a Comment