16 डिसेंबर,2023: ‘वॉर’ आणि ‘पठाण’ नंतर सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर ‘ हा सिनेमा 25 जानेवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .या सिनेमातील ‘शेर खुल गये’ गाणं काल (15 डिसेंबर )रोजी प्रदर्शित झाले असुन चाहत्यांचा गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या केमिस्ट्रीनं फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘शेर खुल गए’ हे एक पार्टी गाणं आहे. या गाण्यातील हृतिक रोशनच्या व दीपिका पादुकोणच्या डान्स मूव्सने प्रेक्षकांना वेड लावले आहे. या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले तर बेनी दयाल व शिल्पा राव यांनी हे गाणं गायले आहे. फायटर मधील या गाण्याला अवघ्या काही मिनिटांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
‘फायटर’ या चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. यामध्ये बरेच ऍक्शन सीन आहेत. या सिनेमाच्या टिझर सोबत ‘शेर खुल गये’ या गाण्याला सुध्दा खूप पसंती मिळत आहे. डान्स साठी प्रसिद्ध असलेला अभिनेता हृतिक रोशन व दीपिका पदुकोण यांची जोडी हिट ठरताना दिसत आहे. ‘फायटर’ सिनेमा विएफएक्स शिवाय बनवण्यात आलेला आहे.
‘फायटर’ सिनेमात हृतिक रोशन व दीपिका पदुकोण मुख्य कलाकार असुन अनिल कपूर, अक्षय ओबरॉय व करण सिंह ग्रोवर हे महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.नवीन वर्षात ‘फायटर’ या सिनेमाची जबरदस्त एन्ट्री होणार आहे. हा सिनेमा बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.