
कैटरिना कैफ – विजय सेतुपतीच्या ‘मेरी ख्रिसमस’ मधील टाइटल ट्रॅक रिलीज, चाहत्यांची भरभरून पसंती.

पुणे,दि.२६ डिसेंबर,२०२३ : कैटरिना कैफ व साऊथ स्टार विजय सेतुपती यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटातील’ दिन बडा ये खास है, प्यार आस – पास है ‘;हे टायटल ट्रॅक रिलीज झाले असून या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. कैटरिना व विजय सेतुपती यांच्या फोटोसोबत या गाण्याची ऑडिओ क्लिप रिलीज केली आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.
‘टायगर ३’ च्या ग्रँड सक्सेसनंतर कॅटरिनाची परत एकदा धमाकेदार एन्ट्री बघायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये कॅटरिना पहिल्यांदा साऊथ स्टार सोबत झळकणार आहे. ट्रेलरमधील कॅटरिना व विजय सेतुपती यांच्या केमिस्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.मेरी ख्रिसमस हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येनार आहे.
‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट दोन भाषांमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये कैटरिना कैफ व विजय सेतुपती मुख्य भूमिकेत असून याच्या हिंदी व्हर्जनमध्ये विनय पाठक,प्रतिमा कन्नन,संजय कपूर, आणि टिनू आनंद असणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी अंधाधुन व बदलापूर यासारखे चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.