जामखेडमधील ‘रत्नदिप मेडिकल फाऊंडेशन’ विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून SIT चौकशीचे आदेश

जामखेडमधील ‘रत्नदिप मेडिकल फाऊंडेशन’ या संस्थेमधील विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक झाली असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. येथील ८० टक्के विद्यार्थ्यांनी समायोजनाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले होते. वेगवेगळ्या विद्यापीठांना बोलून त्यांच्या प्रश्नांची काही प्रमाणात सोडवणूक करण्यात आली, परंतु आता या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली गेली. त्यांनी ही मागणी मान्य करून याबाबतचे आदेशही दिले आहेत.

या यशाचे संपूर्ण श्रेय आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचं आहे. त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे आभार मानले जात आहेत.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

वाचा संबंधित बातम्या:

टॅग्स:

KarjatJamkhed #StudentIssue #RohitPawar #PuneCityLive

Leave a Comment