
Mumbai Rain : मुंबईत ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद; शाळा आणि महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर

आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल.
#MumbaiRain #MyBMCUpdate #MumbaiWeather #SchoolClosure #CollegeClosure #MumbaiFloods #RainySeason