‘लोकनेता’ गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांची राजकीय जीवनयात्रा.

पुणे, 12 डिसेंबर 2023: महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अजूनही घर करून असलेला, गरिबांचा हक्काचा देवमाणुस, ज्याच्यात राजकीय तत्वज्ञानासोबतच आपुलकीची भावना असणारा नेता माननीय गोपीनाथ मुंढे यांची आज जयंती आहे.गोपीनाथ मुंढे म्हणजे महाराष्ट्रातील एक तडफदार नेतृत्व. त्यांची जीवनयात्रा म्हणजे संघर्ष यात्रा. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाबद्दल जाणुन घेऊया.

व्यतिगत जीवन:गोपीनाथ मुंढे यांचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी परळी येथे झाला.त्यांच्या आईचे नाव लिंबाबाई व वडिलांचे नाव पांडुरंगराव मुंढे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे गावातील शाळेत पूर्ण झाले.त्यानंतर चे शिक्षण आंबेजोगाई येथील स्वामी तीर्थ महाविद्यालयात घेतले.
शिक्षणाची आवड व मेहनतीच्या जोरावर त्यांनी आयएलएस कॉलेज मध्ये वकीलचे शिक्षण घेतले.त्यांचा विवाह प्रज्ञा महाजन यांच्या सोबत 21 मे 1978 साली झाला. त्यांना पंकजा मुंढे,डॉ. प्रीतम मुंढे व यशश्री मुंढे या तीन मुली आहेत.

राजकीय जीवन: गोपीनाथ मुंढे यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय कार्यकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा पक्षाच्या युवा मोर्च्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. मुंढेंनी 1980 – 1985 व 1990 – 2009 या कारकिर्दीत त्यांनी पाच वेळा विधानसभेमध्ये आमदार म्हणुन काम केलं. तसेच 1992 ते 1995 काळात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं. 1995 साली राज्यात युतीचं सरकार आले व त्यात मुंढे आणि प्रमोद महाजन शिल्पकार ठरले. तसेच उपमुख्यमंत्रीपदी गोपीनाथ मुंढे यांची निवड झाली व त्यांनी गोरगरिबांसाठी आपल्या सत्तेचा पदाचा उपयोग करून जनसेवा केली. 2014 साली मोदी सरकारच्या नेतृत्वात मुंढे दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले. 12 डिसेंबर, 2010 साली लालकृष्ण अडवाणी यांनी पुण्यात आयोजित कारणात आलेल्या कार्यक्रमात मुंढेंचा लोकनायक’ असा गौरव केला होता.3 जून दिल्ली विमानतळावर जाताना गोपीनाथ मुंढे यांचा अपघात झाला व जनतेचा नेता आकाशात विलीन झाला.

Leave a Comment