Microplastic is harful for helth :
प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असुन वेळीच प्लास्टिकला आळा नाही घातला तर, आरोग्यह्यासाठी व पर्यावरणासाठी अतिशय धोक्याची बाब आहे.प्लॅस्टिकची योग्य विल्हेवाट लागत नसल्याने प्रदूषण होते व त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर होतो.पण तुम्हाला हे माहित आहे का कि आपल्या दैनंदिन आहारातूनही नकळत प्लास्टिकचे सेवन होते? मायक्रोप्लास्टिकचे कण नकळत शरिरात जातात व त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. हे मायक्रोप्लास्टिक नेमक कशा प्रकारे आपल्या शरीरात जाते जाणुन घेऊया.
‘या’ प्रकारे प्लास्टिकचे कण शरीरात प्रवेश करतात
प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण पाणी,मिठ,मासे,बिअर यांद्वारे शरीरात जातात. या कणांचा मोठा स्त्रोत बाटलीबंद पाण्यात असतो. प्रत्येक व्यक्ती ११,८००ते १,९३,२०० मायक्रोप्लास्टिकचे सेवन वर्षभरात करतो. तसेच हे कण धुळीतून मानवी शरीरात जातात.
मायक्रोप्लास्टिकचा शरीरावर ‘हा’परिणाम होतो
मायक्रोप्लास्टिकमुळ हृदय व फुफ्फुसांच्या समस्या उध्दवतात. तसेच मधुमेह, लठ्ठपणा अणि कर्करोग यासारखे गंभीर आजार होउ शकतात.दररोज २६ ते १३० मायक्रोप्लास्टिक कण फुफ्फुसांच्या संपर्कात येतात त्यामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात.
टिप : वरील सर्व माहिती केवळ माहिती म्हणून वाचकापर्यंत पोहोचवत आहोत,याचा कुठलाही दावा करत नाहीत.