आजच्या धावत्या युगात स्त्रीपुरुष समान आहेत किंवा स्त्री पुरुषांच्या तुलनेत एक पाऊल पुढं आहे, खांद्याला खांदा लावुन आहे असे म्हंटले जातअसले तरी वास्तवात पुरुषांच्या तुलनेत महिलांना त्यांना सुरक्षिततेच्या बाबतीत खुप समस्यांना समोर जावे लागते.त्यातही बाहेर काम करणाऱ्याम्हणजे नोकरदार महिलांना रात्री घरी परत जाताना कधी कधी भयानक परिस्थितीचा सामना करावा लागतो. कधी त्यांच्याबद्दल बोललेलेअश्लील बोल असो किंवा शारीरिक छळ.म्हणुनच या गोष्टींना आळा घालण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी ‘बडीकॉप‘ ,(पोलीस मित्र) ही योजना चालु केली आहे.या योजनेच्या माध्यमातुन महिलांच्या सुरक्षाचा विचार केला जातो आणि त्यावर गरजु महिलेलातात्काळ मदत केली जाते.
मागील काही काळापुर्वी एका नामांकित आय टी कंपनीत महिलेवर बलात्कार करून तिला जीव मारण्याचा प्रकार असो किंवा डॉ.प्रियंका रेड्डीहत्या प्रकरण, अशा घटनांमुळे बऱ्याच घरापासुन दुर काम करत असलेल्या महिलांच्या मनात एक भीती असते अशा महिलांना सुरक्षा प्रदानकरण्याचे काम ही योजना करते.
*बडीकॉप योजना नेमकं कशा पद्धतीने काम करते?*
या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या खास करून आय टी क्षेत्रातल्या महिलांची यादी करून 40 महिलांमध्ये एका पोलिसाची निवड केली जाते. हेपोलीस त्यांचा ई–मेल आय डी व मोबाईल वरून त्यांना संपर्क करून त्यांचा ग्रुप करतात. ज्या महिलेला मदतीची गरज वाटते ती महिलाबडीकॉपला संपर्क करू शकते.
देशात बरेच कायदे, योजना असतात पण लोकांपर्यंत त्या पोचत नाहीत किंवा त्यांना माहीतच नसतात.त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी, महिलांनीआपल्यासाठी असलेल्या सुविधांचा जागरूकतेने लाभ घ्यावा.