Breaking
25 Dec 2024, Wed

BMC Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी!

BMC Bharti
: सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र तसेच हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे संगणक सहाय्यक कंत्राटी (DEO) यांची प्रथम महिन्यांसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याकरीता अति.आयुक्त महानगरपालिका यांची क्र. अति.आयुक्त. (प. 3) / डी/2839/08.12.2022 अन्वये मंजुरी प्राप्त झाली आहे. त्याकरीता खालील पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरीता दि.13.03.2023 ते 15.03.2023 या कालावधीत गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन स्वीकारले जातील. याची सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना खालील प्रमाणे आहे.
शैक्षणिक अर्हता :-
• उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
• उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा १०० गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्णझालेला असावा.
उमेदवाराने संगणक वापराबाबतचे MS-CIT (3 महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा ) शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे.
• उमेदवाराने मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. टंकलेखन शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेमधून उत्तीर्ण केलेला असावा व याबाबतचे महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे. डेटा एन्ट्रीचा वेग कमीतकमी ८००० की डीप्रेशन्स इतका अवगत असावा. एम.एस.वर्ड, एक्सेल व मुलभूत सांख्यिकिय तंत्राच्या संगणक प्रणालीची माहिती असावी.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या / शासनाच्या रुग्णालय / कोविड केअर सेंटर मध्ये किमान ६ माहिने काम केलेल्या उमेदवारास अधिक गुण दिले जातील.
वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय दिनांक 01 मार्च 2023 रोजी 45 वर्षापेक्षा अधिक असू नये.
मानधन :- रु. १८,०००/- ( अठरा हजार रुपये फक्त )
गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/hn8hPi67ThnxSfAM7 अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://portal.mcgm.gov.in उपलब्ध होईल.
शैक्षणिक अर्हता पात्र उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल . )

By admin

महेश राऊत हे Pune City Live या वेबसाईटचे संस्थापक आहेत. ते आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते. Mahesh राऊत हे डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि इतर सेवांमध्येही कार्यरत आहेत, ज्यामुळे ते विविध विषयांवर सखोल माहिती व प्रासंगिक दृष्टिकोन देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *