सावधान चीन मधुन येतोय नवीन virus
चीनमधून आलेल्या नवीन विषाणूची चर्चा: महाराष्ट्रात चिंता करण्याचे कारण नाही
चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus (HMPV) बाबत जागतिक स्तरावर चर्चा सुरू असली तरी महाराष्ट्रात सध्या याबाबत कोणतीही गंभीर परिस्थिती नाही. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एचएमपीव्हीचा महाराष्ट्रात आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही.
आरोग्य विभागाने राज्यातील श्वसन संसर्गाची आकडेवारी तपासली असून, वर्ष २०२३च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये श्वसन संसर्गाच्या घटनांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना आरोग्य विभागाने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:
काय करावे?
1. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.
2. हात स्वच्छ ठेवण्यासाठी साबणाने धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करावा.
3. श्वसनाच्या समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यू ठेवावा.
काय करू नये?
1. गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाऊ नये.
2. आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे.