
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ; योजना खरी कि खोटी मिळणार का महिना ४ ० ० ० ?
Chief Minister’s Child Ashirwad Scheme : समाजमाध्यमांवर ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने काही संदेश सध्या प्रसारित होत असून, यामध्ये १ मार्च २०२० नंतर दोन्ही पालक अथवा एका पालकाचा मृत्यू झालेल्या आणि वय १८ वर्षांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील दोन मुलांना ‘बाल सेवा योजना’ अंतर्गत दरमहा ४ हजार रुपये दिले जाणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ही माहिती पूर्णपणे खोटी असून केवळ अफवा आहे, असे ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
विभागाने नागरिकांना या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. या संदेशामध्ये दिलेली माहिती अधिकृत नसून, अशा योजनेची कोणतीही घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही. नागरिकांनी अशा खोट्या संदेशांपासून सावध राहावे आणि कोणतीही शासकीय योजना खरी आहे की नाही याची खातरजमा अधिकृत सूत्रांकडून करावी, असेही विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाने यासंदर्भात जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांनी काही शंका असल्यास थेट विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.