Gadge Maharaj Punyatithi : संत गाडगे महाराज यांचे अनमोल विचार
Gadge Maharaj Punyatithi: डेबुजी झिंगराजी जानोरकर ज्यांना सामान्यतः संत गाडगे महाराज (Gadge Maharaj) आणि गाडगे बाबा (Gadge Baba) म्हणून ओळखले जाते. गाडगे बाबा हे एक समाजसुधारक आणि भटके सेवक होते. संत गाडगे महाराज यांचे अनमोल विचार आपण जाणून घेऊयात .
* आईबापाची सेवा करा.
* हुंडा देऊन किंवा घेऊन लग्ने करू नका.
* सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले आहेत ते अवघे चपातीचोर (ढोंगी)
दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात वर करा. ***
* वेड लागले जगाला देवा म्हणती धोंड्याला.
शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलो हे कळते. विद्या शिका अन् गरीबाले विद्येसाठी मदत करा. *
* माणसाने माणसांबरोबर माणसाप्रमाणे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे.
माणसाचे खरोखर देव जर कोणी असतील तर ते त्याचे आईबाप. * दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाहीत.
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे.
दगड, धोड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्यांसारखे मुके प्राणी बळी देऊ नका. * कार्यकर्त्याने शुध्द अंतःकरण व निष्काम सेवाभावीपणाने सेवा केल्यास
टीकेची पर्वाच करण्याचे कारण नाही.
* नवरा रोज दारू पिऊन घरी येत असेल तर बाईने चुलीतली राख टोपलीत भरून त्याच्या तोंडात घालावी. बाप दारू पिऊन घरी येत असेल तर मुलांनी त्याला बडवून पोलीस चौकीत न्यावे.
* महारोग झाला की माणसाला वेगळे टाकतात. मग तो निराश होऊन भीक मागायला लागतो. त्याची सेवा आपण केली पाहिजे.
* राजा आणि करोडपती ही माणसे नाहीत, साप आहेत. नुसता दंश करुन प्राण घेतात. त्यांना माणसाची पदवी नाही. राजे आणि सावकार यांना श्रीमंताची पदवी आहे.
* आपण रस्त्याने चालत जातो. चालतांना ठोकर लागते पण माणूस काही परत ठोकर लागेल म्हणून रस्ता सोडीत नाही. पण सावधपणाने