Holiday on 22 january 2024 :अयोध्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 22 जानेवारीला उत्तर प्रदेशात सार्वजनिक सुट्टी जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 22 जानेवारीला अयोध्येत होणार्या रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठा सोहळा हा देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशात उत्साह दिसून येत आहे. जगभरातील भारतीय लोकं याची वाट पाहत आहेत. कारण शेकडो वर्षानंतर राम मंदिर बनत आहे.
यानिमित्ताने योगी सरकार या कार्यक्रमासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. संपूर्ण जगाच्या नजरा अयोध्येवर असतील. या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात हजारो व्हीव्हीआयपी शहरात येणार आहेत. करोडो रामभक्त हा कार्यक्रम टीव्ही चॅनेल्सवर पाहतील.
यासंदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. योगी सरकारने 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि व्यवसाय बंद राहतील.
या सुट्टीमुळे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील रामभक्तांना सहजता होईल. ते या ऐतिहासिक क्षणाचा प्रत्यक्ष साक्षीदार होऊ शकतील.
या सुट्टीच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते या सोहळ्यासाठी तयारीला लागले आहेत.