दहीहंडी उत्सव निमित्त : पुण्यात वाहतूक व्यवस्थेत बदल !
पुणे, ७ सप्टेंबर २०२३: पुण्यात आज, ७ सप्टेंबर २०२३ रोजी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर सायंकाळी १७:०० वा. पासून दहीहंडी फुटे पर्यंत बुधवार चौक ते दत्तमंदीर चौक तसेच बेलबाग चौक ते सेवासदन चौक बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौ. मंडई चौक (बाबु गेणु चौक), साहित्य परिषद चौक, नवी पेठ इ. ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने वाहतूक व्यवस्था बदलीचा निर्णय घेतला आहे.
या बदलांनुसार,
- शिवाजीरोड वरुन स्वारगेटला जाणेकरीता स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक पुढे टिळकरोडने शास्त्री रोडने इच्छित स्थळी जातील.
- पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगर कडे जाणेकरीता पुरम चौकातुन टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छित स्थळी जातील. तसेच पुरम चौकातुन सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जातील.
- स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणेकरीता स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छितस्थळी जातील..
- बुधवार चौकाकडुन आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक सोडण्यात येईल. आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
- रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतुक बंद करण्यात येत असुन पर्यायी मार्गाचा वापर करावा..
- सोन्या मारुती चौकाकडुन लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. सदरची वाहने सोन्या मारुती चौकातुन उजवीकडे वळुन फडके हौद चौकातुन इच्छित स्थळी जातील..
- शिवाजी रोडवरुन जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलकडे जाणारी वाहतूक हि गाडगीळ पुतळा येथून जनी सातोटी पोलीस चौकी मार्गे स्थिळी जाईल.
या बदलांमुळे वाहतूक कोंडी होणार नाही आणि वाहनचालकांची गैरसोय होणार नाही याची पुणे पोलीस आयुक्तालयाने काळजी घेतली आहे.