Meftal : चे अतिसेवन ठरू शकते घातक! सरकारचा इशारा
मेफ्टलसारख्या पेनकिलरचा अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक
मुंबई, दि. 7 जुलै 2023 : सर्दी, खोकला, डोकेदुखी या सामान्य आजारांसाठी मेफ्टलसारख्या पेनकिलरचा अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. इंडियन फार्माकोपिया कमिशन (IPC) ने याबाबत जनतेला गंभीर इशारा दिला आहे.
मेफ्टलमध्ये नॉन स्टेरॉईडल अँटी इंफ्लोमेन्टरी ड्रग चे प्रमाण जास्त असते. मेफेनॅमिक ऍसिड, ड्रेस यांसारख्या घटकाचा समावेश असल्यामुळे हे घटक शरीरासाठी हानिकारक आहेत. या घटकांचे सेवन केल्याने अवयवांना नुकसान होऊ शकते.
बऱ्याच वेळेस डॉक्टरांच्या सल्याशिवाय मेडिकलवर जाऊन मेफ्टल, माईग्रेन किंवा मेफ्टल स्पास सारख्या गोळ्या घेतल्या जातात. मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठीही महिला या गोळ्या घेतात. मात्र, या गोळ्यांचा अतिवापर केल्यास आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो.
हे वाचा –
IPC ने याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी यासारख्या सामान्य आजारांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचे सेवन करू नये. या आजारांवर घरगुती उपाययोजना करून आराम मिळू शकतो.
स्पर्धेच्या युगात कामाच्या ताणामुळे अनेकदा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे लक्षात ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. गोळ्या औषध खाण्यापेक्षा योगा, प्राणायाम करणे अधिक फायदेशीर आहे.