Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Pune : विडिओ कॉल वर तिला नग्न पाहन महागात पडले , कॉम्पुटर इंजिनिअर ला ७ लाख रुपयांना गंडा !

0

Pune :संगणक अभियंता असलेल्या तरुणाला सेक्सटॉर्शनमध्ये अडकवून त्याला ७ लाख १४ हजार रुपये भरायला लावून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आंबेगाव येथील एका ३३ वर्षांच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादी तरुणाला एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. कॉल चालू असताना तिने आपल्या अंगावरचे कपडे उतरवले. ते पाहात असल्याचे स्क्रीन शॉट या महिलेने काढले. हे स्क्रीन शॉट व व्हिडीओ त्याच्या मित्रांना पाठविण्याची तिने धमकी दिली.

 

त्यानंतर दिल्ली सायबर कमिशन श्रीवास्तव बोलत आहे. पोलिसांना तपास करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून तिने फिर्यादीकडून वेळोवेळी ७ लाख १४ हजार ४२४ रुपये उकळले. शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक पुराणिक तपास करीत आहेत.

Follow Us
Leave A Reply

Your email address will not be published.