हिवाळा म्हटले कि सर्दी खोकला यासारख्या आजाराचे प्रमाण वाढते. काही जणांना तर छोट्या छोट्या आजारांपासून निमोनिया सारख्या आजारांचा सामना करावा लागतो. आरोग्याच्या या समस्या टाळण्यासाठी स्वतःची देखभाल करणे आवश्यक आहे. यासाठी खालील टिप्स नक्की जाणून घ्या.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शारीरिक समस्या टाळण्यासाठी शरीराचे संतुलित तापमान ठेवावे लागते. तापमानात घट झाल्यानं सर्दी, खोकला यांसारखे आजार उद्धभवतात. तसेच या दिवसांत शरीराची हालचालही कमी होते त्यामुळे फिट आणि स्वस्थ राहण्यासाठी खाण्यापासून तर व्यायामपर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.
पेय (पाणी) : हिवाळ्याच्या दिवसांत उन्हाळा ऋतूपेक्षा कमी प्रमाणात तहान जरी लागत असली तरी पाण्याचे प्रमाण हे तेवढेच असायला हवे. त्याचबरोबर चहा व कॉफी यासारखे पेय जास्त न घेता सूप किंवा डाळीचे पाणी यासारखे पेय घ्यावे त्यामुळे सर्दी सारखे आजार कमी प्रमाणात होतात.
आहार कसा असावा: हिवाळा ऋतूत योग्य आहाराची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. या दिवसांत आजारापासून दूर राहण्यासाठी कडधान्य, दलिया, उकडलेली अंडी यांचा समावेश असावा.तसेच भाज्या व
फळांचेही सेवन करावे. यामध्ये खनिजाचे प्रमाण असते त्यामुळे आजाराशी लढायला रोगप्रतिकारक शक्ती वाढते .सर्दी असल्यास आंबट पदार्थ खान टाळावे.
उबदार कपडे: थंडीच्या दिवसांत शक्य होईल तेवढ्या प्रमाणात उबदार कपडे वापरावे. पाय मोजे, हात मोजे, टोपी या गोष्टींचा वापर करावा. सकाळी सकाळी बाहेर फिरायला जाताना स्वेटर घालावे त्यामुळे शरीरातील ऊब कायम राहते. तसेच हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी लोशन किंवा घरगुती सायीचा वापर करावा.
आवश्यक व्यायाम: निरोगी शरीरासाठी आहारासोबतच व्यायाम खूप आवश्यक आहे. शरिराची हालचा खूप महत्वाची असते त्यामुळे जिममध्ये जाऊन व्यायाम करणे शक्य नाही झाले तरी चालणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे जेवणानंतर किंवा सकाळी, रात्री शक्य होईल तेव्हा चालावे. व्यायामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि रक्तप्रवाह पण वाढतो. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.