पुणे: खडकी वाहतूक विभागात वाहतूक मार्ग बदल , जाणून घ्या !

पुणे, 01 सप्टेंबर 2023: पुणे शहरातील खडकी वाहतूक विभागात (Change of traffic route) महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन (Metro Rail Corporation) लि. यांचेतर्फे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान एकेरी मार्ग करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. खडकी बाजार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.

सद्यस्थितीत मेट्रोचे काम ब-यापैकी पूर्ण झाले असल्याने वाहनचालकांची गैरसोय टाळणेकरीता सदर ठिकाणचे वाहतूकीत बदल करणे गरजेचे आहे. या संदर्भात, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१ / सीआर – ३७ / टीआरए-२, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६( १ ) (ए) (बी), ११६ ( ४ ) आणि ११७ अन्वये पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, अतिरिक्त कार्यभार पोलीस उप-आयुक्त, वाहतुक, पुणे शहर, रोहिदास पवार यांनी दि. ०१/०९/२०२३ ते दि. १५/०९/२०२३ रोजीपर्यंत प्रायोगिक तत्वावर खालीलप्रमाणे मार्ग वापरण्यास परवानगी दिली आहे.

खडकी वाहतूक विभाग पुणे अंतर्गत

  • बोपोडी चौकामधुन शिवाजीनगरकडे जाणा-या दुचाकी, तीनचाकी व हलक्या चारचाकी वाहनचालकांना बोपोडी चौक, सरळ खडकी रेल्वेस्टेशन, सी. एफ. व्ही. डी. (फुटबॉल मैदान) येथून डावीकडे वळण घेवून सरळ ऑर्डन्स फॅक्टरी हॉस्पीटल समोरुन उजवीकडे वळण घेवून संविधान चौक (चर्च चौक) येथून इच्छितस्थळी जावे.

  • खडकी बाजारातून पिंपरी चिंचवडकडे जाणा-या दुचाकी, तीनचाकी व हलक्या चारचाकी वाहनचालकांनी संताजी घोरपडे मार्गावरुन सी. एफ. व्ही. डी. चौकामध्ये येवून उजवीकडे वळण घेवून इच्छितस्थळी जावे.

या बदलामुळे वाहनचालकांची गैरसोय कमी होईल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 हे वाचा – Maharashtra Rain : सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन

Scroll to Top