पुणे, २६ ऑगस्ट २०२३: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसचे लाइव्ह लोकेशन आता गुगल मॅपवर दिसणार आहे. यामुळे पुणेकरांना घरबसल्या बसची माहिती मिळेल. तसेच, पीएमपीचे तिकीट देखील ऑनलाईन काढता येणार आहे.
पीएमपीसोबत गुगलचा करार झाला आहे. या करारानंतर गुगलला हवी असणारी माहिती देण्यात आली. यामुळे आता १४ पीएमपी बसेसमध्ये उपकरण बसवण्यात आले आहे. या उपकरणाद्वारे बसचे लोकेशन, वेळ, आणि इतर माहिती गुगलला पाठवली जाणार आहे.
हे वाचा – Pune Airport : पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत गेल्या वर्षी तब्बल 50 टक्के वाढ
पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, या सेवामुळे पुणेकरांना बसची माहिती मिळवणे सोपे होईल. तसेच, पीएमपीच्या सेवांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल.
या योजनेची चाचणी पुण्यातील १४ बसेसवर करण्यात येत आहे. या चाचणीनंतर सर्वच बसेस गुगलवर ट्रॅक करता येतील.