विश्रांतवाडी : दारूऐवजी दूध पिण्याचा संदेश

दारूऐवजी दूध पिण्याचा संदेश

विश्रांतवाडी, 03 जानेवारी 2024: विश्रांतवाडी, आळंदी रोड येथील महेश वाइन्स येथे काँग्रेस वडगावशेरी ब्लॉक उपाध्यक्ष सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना एक एक ग्लास दूध वाटप करण्यात आले. यावेळी भोसले म्हणाले की, दारू पिल्याने अनेक अपघात होतात, तसेच भांडणसुद्धा होण्याची शक्यता असते. दारू आरोग्यास हानिकारक असते. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला अनेकजण दारू पितात. त्याऐवजी नागरिकांनी दूधाचे सेवन केले तर ते आरोग्यास फायदेशीर ठरेल.

या उपक्रमाला साहाय्यक सरपंच अझर खान यांनीही पाठिंबा दिला. त्यांनी नागरिकांना दारू सोडण्याचा संदेश दिला. यावेळी उपस्थित साहाय्यक सरपंच नंदू राक्षे, किरण खंडाळे, राजेश शेलार, निलेश मकासारे, अनिल चिमटे, सन्नी राव आणि उवेश मन्सूरी यांनीही नागरिकांना दूध वाटून संदेश दिला.

या उपक्रमामुळे नागरिकांना दारूच्या व्यसनाबद्दल जागरूकता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.

Scroll to Top