अमेरिकेत पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असलेल्या भारतीय तरुणाची हत्या करण्यात आली. इंधन पंपावर झालेल्या गोळीबारात २४ वर्षीय साईश वीरा याला प्राण गमवावे लागले. तो आंध्र प्रदेशातील अमरावती येथील मूळ रहिवासी होता. अमेरिकेतील ओहायो राज्यातील पोलिसांनी याविषयी माहिती दिली.