ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस कुरीअर कंपनीच्या गाडीतुन महागडे इलेक्ट्रॉनिक वस्तु चोरणारे आरोपींना २४ तासात जेरबंद
Pune news today in marathi : ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस (Blue Dart Express) कुरीअर कंपनीच्या गाडीतुन महागडे इलेक्ट्रॉनिक वस्तु चोरणारे आरोपींना गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने २४ तासात जेरबंद केले आहे. आरोपींना ३,९०,४४५/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१० ऑगस्ट २०२३ रोजी ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस कुरीअर कंपनीचे माल वाहतुकी दरम्यान अनोळखी इसमांनी अॅपल कंपनीचे फोन, आयपॅड तसेच डिजीटल वॉच असा एकुण ३,९०,४४५/- रु किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. १९३ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ अन्वये रात्रौ उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन, युनिट-२ प्रभारी अधिकारी श्री.नंदकुमार बिडवई यांनी सपोनि. वैशाली भोसले, पोलीस अमंलदार, गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण, अमोल सरडे, साधणा ताम्हाणे, संजय जाधव, उज्वल मोकाशी, उत्तम तारु अशी टिम तयार करुन त्यांना गुन्हयाची उकल करण्यासाठी महत्वाच्या सुचना व मागदर्शन करण्यात आले होते.
त्याअनुषंगाने दिनांक ११/०८/२०२३ रोजी सपोनि वैशाली भोसले व यूनिट – २ कडील टिम सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समांतर तपास करीत असतांना युनिट-२ कडील पोलीस अमंलदार, पुष्पेंद्र चव्हाण व अमोल सरडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन संशयीत इसम पद्मावती ट्रॅव्हल्स पार्कींग येथे चोरीचे महागडे फोन विक्रीसाठी आले असुन ते ग्राहक शोधत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, युनिट-२ कडील वरील टिम तात्काळ पद्मावती ट्रॅव्हल्स पार्किंग जवळ सापळा रचुन शिताफीने संशयीत इसम नामे १) अभिजीत अरुन जाधव, वय २६ वर्षे, रा. मु.पो. मुकादम वाडी, कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे २) अक्षय संभाजी निंबाळकर, वय २३ वर्षे, रा. मु.पो.मळद, ता. दौंड, जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन ३,९०,४४५ /- रु किमंतीचे ०५ नग अॅपल कंपनीचे आय फोन, ०१ नग अॅपल कंपनीचा आय पॅड व ०३ नग डिजीटल वॉच असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन, वरील गुन्हा उघडकीस आणला आहे.
हे वाचा – घरबसल्या पॅकिंग काम अहमदनगर (Packing Work From Home In Ahmednagar)
आरोपीतांकडे प्राथमिक तपास केला असता, त्यांनी ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस कंपनीचा माल घेवुन जात असतांना प्रवासा दरम्यान चोरी केल्याचे सांगुन गुन्हयाची कबुली दिलेली आहे. नमुद आरोपी हे ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस कंपनी मध्ये ड्रायव्हर, क्लिनर म्हणुन नोकरीस असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीतांची वैदयकीय तपासणी करुन, त्यांना पुढील तपासकामी सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.