Loni kalbhor : शेतीच्या वादावर हाणामारी , पाय फॅक्चर ! पुण्यात शेतकऱ्याला 7 इसमांनी केली बेदम मारहाण !

लोणीकाळभोर : शेती खरेदी केल्याने शेतकऱ्यावर मारहाण

लोणीकाळभोर, ता. हवेली जि. पुणे (Pune) येथे शेती खरेदी केल्याने शेतकऱ्यावर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बाळासाहेब विरकर (वय ६० वर्षे, रा. रुपनवर वस्ती, लोणीकाळभोर) यांनी लोणीकाळभोर(Loni kalbhor ) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादी यांनी सदर ठिकाणाची शेती खरेदी केली होती. या शेतीच्या व्यवहारात काही वाद निर्माण झाला होता. या वादावरून दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी स. ०८:०० वा. फिर्यादी यांचे शेतामध्ये विनोद गायकवाड, प्रमोद गायकवाड, रवींद्र गायकवाड, बाबा गायकवाड, राजू गायकवाड, संजय गायकवाड आणि सुभाष गायकवाड (सर्व रा. रुपनवर वस्ती, लोणीकाळभोर) हे आले. त्यांनी फिर्यादी यांना खो-यानी व हाताने मारहाण केली. शिवीगाळ करून त्यांचा डावा पाय फॅक्चर केला.

पोलिस उपनिरीक्षक तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी फिर्यादी यांचे बयान नोंदवले असून, आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू आहे.

 

Leave a Comment