मुंढवा चौकात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचे त्वरित निराकरण (Mundhwa Chowk : Quick resolution of the pothole in Mundhwa Chowk, appreciates the traffic department officials )
पुणे, 14 सप्टेंबर 2023: मुंढवा चौकात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहने आदळून वाहन चालकांचे नुकसान होत होते. याबाबत नागरिकांनी मुंढवा वाहतूक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची गांभीर्याने घेत पुणे पोलिसांच्या मुंढवा वाहतूक विभागाच्या कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांनी त्वरित खड्डा बुजवून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.
मुंढवा चौकात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मोठ्या वाहनांनाही जाणे कठीण होत होते. या खड्ड्यामध्ये काही वाहने आदळून वाहन चालकांचे नुकसान झाले होते. याबाबत नागरिकांनी मुंढवा वाहतूक विभागाकडे तक्रार केली.
या तक्रारीची गांभीर्याने घेत मुंढवा वाहतूक विभागाचे पीआय पिंगळे, पीएसआय जाधव, रणधीर आणि हवालदार टपके यांनी त्वरित खड्डा बुजवण्यासाठी कार्यवाही केली. त्यांनी खड्ड्यामध्ये डांबर टाकून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.
या कामगिरीसाठी मुंढवा वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहन चालकांचे आणि नागरिकांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, वाहतुकीची सुरक्षेसाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. यापुढेही आम्ही अशा समस्यांचे त्वरित निराकरण करू.