Dhayri : पुण्यात हृदय विदारक घटना ! त्याचा जन्म होतात आईने फेकून दिल ! , अज्ञात इसमाचा शोध सुरू !

पुणे: धायरीत बेवारस नवजात बालकाचा मृतदेह सापडला

पुणे, दि. १८ डिसेंबर २०२३: पुण्यातील सिंहगड रोड (Sinhagad Road) पोलीस ठाण्यात बेवारस नवजात बालकाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune )

फिर्यादी शशिकांत थोपटे (वय ३२ वर्षे, रा. वडगाव बु., पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८:०० वाजताच्या सुमारास धायरी (Dhayri ) येथील वडजाई माता डेअरीच्या विरुद्ध बाजूला, सणस शाळेच्या भिंतीचेलगत त्यांना बेवारस नवजात बालकाचा मृतदेह सापडला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बालक हे पुरुष जातीचे आहे. त्याचे वय अंदाजे २४ तास असावे. मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात इसमावर भादवी कलम ३१८ (अपत्य जन्माची माहिती लपवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक खडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

Leave a Comment