Pune news : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आणि महापालिकेच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना थेरगाव येथे उद्या दुपारी 3 वाजता विविध दाखले आणि लाभाचे वाटप करण्यात येणार आहे.
silver rate today pune : जाणून घ्या ,आजचे चांदीचे बाजारभाव !
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप तसेच विविध दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी थेरगाव येथील पदमजी पेपर मिलजवळ भव्य मंडप उभारण्यात आला असून त्यात विविध कक्ष तयार करण्यात आले आहेत. नागरिकांना यावेळी उत्पन्नाचा दाखला,
हडपसर गाडीतळ : येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली !
नवीन मतदार नोंदणी, रहिवासी दाखला, सातबारा, आठ अ, हवेली तालुक्यातील रहिवाशांकरिता जातीचा दाखला, वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला, 33 टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला दिला जाणार आहे. आधार कार्डमधील नवीन दुरूस्ती व अद्यावत करणे, मतदार ओळखपत्राची आधार कार्डशी जोडणी करणे, शिधापित्रकेवरील नाव कमी करणे, शिधापत्रिकेवरील नाव वाढविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा दाखला, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा (नॉन क्रिमीलिअर) दाखला देणे आदी सेवाही देण्यात येतील.