कुपवाडा, ७ नोव्हेंबर २०२३ – काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj ) अश्वारूढ पुतळा उद्या, मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पित होणार आहे. या कार्यक्रमास जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार आहेत. ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या पुढाकाराने कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे. हा पुतळा साडे दहा फूट उंचीचा असून, जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू-काश्मीरमधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला आहे.
हे वाचा – आयटीबीपी कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) भरती 2023: 248 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक महान योद्धा होते. त्यांच्या पराक्रमाने आणि देशभक्तीने संपूर्ण देशभरात त्यांची कीर्ती पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारत-पाकिस्तान सीमेनजीक उभारला जाणे हे एक ऐतिहासिक महत्त्वाचे पाऊल आहे. हे पुतळे देशभक्ती आणि स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक बनेल.