नंदुरबारमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिवस उत्साहात साजरा
नंदुरबार, 25 डिसेंबर 2023 – 24 डिसेंबर 1686 रोजी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून भारतात सजरा करण्यात येतो. सालाबादाप्रमाणे यावर्षीही 24 डिसेंबर हा दिवस शासन आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय नंदुरबारच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी याठिकाणी अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार, कल्याणी गॅस एजन्सी, नंदूरबार आदी स्टॉलचे उद्घाटन मा. तहसीलदार साहेब नितीन गर्जे, नायब तहसीलदार रमेश वळवी, नायब तहसीलदार राजेश अमृतकर, यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित सहाय्यक पुरवठा अधिकारी चौरे मॅडम, रवींद्र. घोडके, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा संघटक वासुदेव माळी, नंदुरबार तालुका सचिव गोरखनाथ बावा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा. तहसीलदार साहेब नितीन गर्जे यांनी ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, ग्राहक म्हणून आपल्याला आपल्या हक्कांची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, आपल्याला ग्राहक हक्कांवर आधारित आपली खरेदी करणे आवश्यक आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नंदुरबार जिल्हा संघटक वासुदेव माळी यांनी ग्राहकांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नेहमीच साथ देईल.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नंदुरबार तालुका सचिव गोरखनाथ बावा यांनी ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच मान्यवर व उपस्थित नागरिकांचे मा. सहाय्यक पुरवठा अधिकारी चौरे मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.