रोहीत शर्माच्या कर्णधार पदाच्या ‘रिप्लेसमेंट’ मुळे मुंबई इंडियन्स फॅन्स कडून संताप व्यक्त.

16 डिसेंबर,2023: रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स चे नाते मुंबई इंडियन्सचे फॅन्स 2013 पासून बघत आले आहेत.पण आता हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवल्यापासून मुंबई इंडियन्सच्या फॅन्स मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातुन नाराजी बघायला मिळत आहे.

गेल्या दहा वर्षात रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचे यशस्वी कर्णधार पद भूषविले आहे.
रोहित शर्मानं त्याच्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी पटकवली आहे. गेल्या सिजन मध्ये सुद्धा त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने प्लेऑफ्स मध्ये मजल मारली होती. परंतु आता चालु सिजन मध्ये अचानक कर्णधार पद हार्दिक पांड्याकडे गेल्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. आपली नाराजगी व्यक्त करत,’मुंबई इंडियन्सने हिरा गमावला असे म्हंटले आहे. दुसरीकडे गुजरातच्या चिंतेत मोठी भर पडली आहे कारण हार्दिक पांड्या परत मुंबई इंडियन्स मध्ये परतला आहे. मागील दोन सिजन मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने अत्यंत चांगली कामगिरी केली होती. पांड्यानंतर शुभमन गिल नवा कर्णधार असु शकतो अशी चर्चा चालू आहे.

मुंबई टिममध्ये रोहित शर्मा आपल्या खेळाच्या तल्लख बुद्धीद्वारे योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे तसेच तो मुंबई इंडियन्सच्या बॅटींगचा महत्वाचा स्तंभ होता. नव्या सिजन मध्ये मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली कशी परफॉर्म करते हे पाहणे चुरशीचे ठरेल.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

Leave a Comment