Dighi Pune :मुलीचे फेक इन्स्टाग्राम अकाउंट्स बनवून ,अश्लील मॅसेजेस पाठवायचा , आईला दिली जीवे मारण्याची धमकी !
दिघीमध्ये महिलेला सोशल मीडियावरून बदनामी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
दिघीमध्ये महिलेला सोशल मीडियावरून बदनामी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
दिघी, २७ मे २०२४ – परांडेनगर दिघी (Parandenagar Dighi) येथील एक २७ वर्षीय महिला आपल्या सामाजिक व वैयक्तिक जीवनात एक गंभीर संकटाला सामोरी गेली आहे. तिच्या पर्सनल मोबाईल नंबरचा गैरवापर करून, सोशल मीडिया (Social media) वर बदनामी करणाऱ्या आरोपीविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने प्रविण प्रभाकर चौरे (वय ३६ वर्षे, रा. खंडाळा, ता. बीड) याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
दि. २७/१२/२०२३ पासून ते २६/०५/२०२४ या कालावधीत, आरोपीने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवरून फिर्यादी महिलेचा पर्सनल मोबाईल नंबर प्रसारित करून तिची बदनामी केली. प्रविण प्रभाकर चौरे याने वेगवेगळी फेक इन्स्टाग्राम अकाउंट्स बनवून, त्याचे इन्स्टाग्राम आयडी नं. ….वरून फिर्यादीचे इन्स्टाग्राम आयडी … वर अश्लील मॅसेजेस पाठवले. या मॅसेजेसमधून आरोपीने फिर्यादी आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली.
फिर्यादी महिलेचा घटस्फोटीत पती आरोपी आहे. त्याने आपल्या मोटारसायकल आणि फोर व्हिलरमधून परांडेनगर, दिघी, पुणे ते वायसीएम हॉस्पिटल, पिंपरी, पुणे(YCM Hospital, Pimpri, Pune) दरम्यान तिचा लैंगिक उद्देशाने पाठलाग करून तिचा विनयभंग केला.
दि. २७/०५/२०२४ रोजी सायं. ७.१४ वाजता दिघी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३५४ (ड), ५०६, ५०० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी प्रविण प्रभाकर चौरे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तपास अधिकारी पोउपनि कटपाळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.