Pimpri chinchwad : चैन स्नेचिंग करुन फरार झालेला आरोपी अवघ्या २ तासात जेरबंद

कात्रज परिसरात तीन इसमांनी एक तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न
चैन स्नेचिंग करुन फरार झालेला आरोपी अवघ्या २ तासात मुद्देमासह केले जेरबंद

पुणे, ६ जानेवारी २०२४ – पुणे शहरातील (Pune ) चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक ५ जानेवारी रोजी दुपारी एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने ओढून चोरून नेणारा आरोपी अवघ्या २ तासात मुद्देमासह चिखली पोलिसांनी जेरबंद केला. (Pimpri chinchwad)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ५ जानेवारी रोजी दुपारी १.३० वा. चे सुमारास जाधववाडी चिखली येथील शंकेश्वर कॅपिटल बिल्डींगचे बांधकाम समोरून एक वयोवृद्ध महिला पायी चालत घरी जात होती. त्यावेळी तिच्या पाठीमागून एक हिरव्या रंगाचा टी शर्ट घातलेला व तोंडाला मास्क लावलेला अनोळखी इसम आला. त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने ओढून पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर बसून पळून गेला.

हे वाचा – Pune News : कॉलेजला जायचं सोडून प्रियकरासोबत फिरायची तरुणी , मित्रानेच काढला तसला विडिओ !

या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी एक विशेष तपास पथक तयार केले. तपास पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसून आला. तसेच, आरोपीचा माग काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनाही सहकार्य घेतले.

तपासात असे आढळून आले की, आरोपीचे नाव विनोद सिताराम जाधव असून तो चिखलीतील वंदना जाधव यांचे रुममध्ये राहत आहे. त्याच्या मूळगावी यवतमाळ जिल्ह्यातील तिवसाळा आहे. पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरात छापा मारून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील १,०८,००० रुपयांची सोन्याची पोत जप्त करण्यात आली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे, पोलीस उपनिरीक्षक पुजारी, पोलीस अंमलदार गणेश साबळे, गणेश शिंदे, आनंदा नागरे, राकेश बनसोडे, नारायण तांबे तसेच गुन्हे शाखा युनिट १ कडील सोमनाथ बोहाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अजित रुपनवर, नामदेव वडेकर यांनी ही कारवाई केली.

Leave a Comment