पिंपरी चिंचवड : स्वतःचे आर्थिक फायदयासाठी स्पा मध्ये चालवायचे सेक्स रॅकेट , ०२ पिडीत महिलांची सुटका
स्वतःचे आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणा-यांवरती कारवाई करुन ०२ पिडीत महिलांची सुटका
पिंपरी चिंचवड येथील स्पाचे नावाखाली स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या मुलींना स्पाचे नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात. अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली.
हे वाचा – खुशखबर : पीएमपीएमएल च्या कर्मचाऱ्यांना जुलै पासून सातवा वेतन आयोग लागू ….
त्यानंतर अशा व्यक्तींची गोपनीय माहिती काढून, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक २१/०६/२०२३ रोजी हिंजवडी परिसरातील Luminous SPA शॉप नं २०६, दुसरा मजला, सुरतवाला मार्क प्लाझा, हिंजवडी वाकड रोड, पुणे या ठिकाणी सापळा रचुन सदर ठिकाणी बनावट ग्राहकासह अचानकपणे छापा टाकुन, आरोपी १) राहुल नवनाथ कांगणे, वय २८ वर्षे, रा. सुनिल कसाळे यांची रुम, सुतार वस्ती, माण ता. मुळशी जि. पुणे मुळ पत्ता मु.कुणकी ता.जळकोट जि.लातुर याचे ताब्यातून दोन पिडीत मुलींची वेश्याव्यवसायातुन सुटका करुन आरोपी विरुध्द हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुरनं ७४१/२०२३ भादंवि क ३७०(३) सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशन करीत आहेत.