पिंपरीत ‘भाई’च्या बर्थडे पार्टीचा हैदोस: टोळक्याचा कोयता आणि रॉडने धुमाकूळ, गाड्यांची तोडफोड

पुणे, ९ सप्टेंबर: पुणे जिल्ह्यातील पिंपरी (Pimpri) येथे ‘भाई’च्या वाढदिवसानिमित्त (Brother’s birthday) एका टोळक्याने मोठा हैदोस घातला. आरोपींनी नागरिकांना शिवीगाळ करत, त्यांच्याकडून खंडणी (Extortion) वसूल केली. तसेच, कोयता आणि लोखंडी रॉड घेऊन हवेत फिरवत दहशत निर्माण केली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध सुरू आहे.

काय घडले?

ही घटना ८ सप्टेंबर, २०२५ रोजी पहाटे १ वाजताच्या सुमारास चिंचवडमधील गोल्डन चौक, विद्यानगर रोडवर घडली. फिर्यादी परशुराम रमाप्पा बसरकोड (वय ५४), जे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत, यांनी पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी घरासमोर बसलेले असताना, आरोपी सुजल सूर्यवंशी, तन्मय चव्हाण आणि अमोल त्यांच्यासमोर गाडीवरून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुजलने फिर्यादीला कोयता आणि तन्मयने चाकू दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांनी फिर्यादीकडे २००० रुपयांची खंडणी मागितली. घाबरून फिर्यादीने त्यांना १२०० रुपये दिले.

वाढदिवसाच्या रात्री हैदोस

त्याच दिवशी, रात्री १ वाजण्याच्या सुमारास आरोपी पुन्हा फिर्यादीच्या घरासमोर आले. “आज भाईचा बर्थडे आहे, आज गल्लीतील लोकांची आई झवायची,” असे ओरडत त्यांनी हातातील कोयते आणि लोखंडी रॉड हवेत फिरवले.

आवाज ऐकून लोक आपापल्या दरवाज्यातून बाहेर आले असता, आरोपी सुजलने फिर्यादीकडे “ए मादरचोद २००० रुपये घेऊन ये,” अशी मागणी केली. फिर्यादीने दोन दिवसांपूर्वीच पैसे दिले असल्याने नकार दिला. यावर आरोपींनी रागाच्या भरात फिर्यादीच्या इनोव्हा गाडीची ४०,००० रुपये किमतीची तोडफोड केली.

यावेळी लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही “तुम्ही मध्ये पडू नका, नाहीतर तुम्हालाही मारून टाकू,” अशी धमकी दिली. आरोपींनी कोयते आणि रॉड हवेत फिरवून लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण केली. यामुळे लोक सैरावैरा पळून लपून बसले. आरोपींनी परिसरातील इतर गाड्यांचीही तोडफोड केली.

या प्रकरणी, पोलिसांनी आरोपी सुजल सूर्यवंशीला अटक केली आहे. इतर आरोपी तन्मय चव्हाण आणि अमोल फरार आहेत. आरोपींवर पिंपरी पो.स्टे. गु.र.नं. ४६६/२०२५, भा.न्या.स. कलम ३०८(४), ३(५), ३२४(४), ३५१(२)(३), ३५२, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), क्रिमिनल अ‍ॅमेंडमेंट अॅक्ट कलम ३ सह ७ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment