wakad : काळेवाडीतील जुन्या वादाचा राग: १५ वर्षीय मुलाला लोखंडी कोयत्याने मारहाण, दोघे अटकेत

काळेवाडीत जुन्या वादावरून हाणामारी: १५ वर्षीय मुलाला लोखंडी कोयत्याने मारहाण, दोघे अटकेत

Pimpri Chinchwad: वाकड (wakad)पोलीस ठाण्याच्या हद्दीत भैय्यावाडी, भारतमाता चौक, काळेवाडी (Pimpri Chinchwad News) येथे १३ जून २०२४ रोजी रात्री १०:२० वाजता झालेल्या हाणामारीच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.(Pimpri Chinchwad News Marathi ) तक्रारीनुसार, १५ वर्षीय अल्वयीन बालकाने या घटनेची तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादीला त्याचा मित्र विधीसंघर्षित बालकाने बोलावून घेतले. फिर्यादी व त्याचा मित्र तेथे गेले असता, जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी क्रमांक २ रियान मोईन खान (वय २० वर्षे) याने फिर्यादीस कानाखाली मारली, तर आरोपी क्रमांक ३ मोहम्मद सिराज शहा (वय १८ वर्षे ३ महिने) याने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने मारून जखमी केले. तसेच, फिर्यादीच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली.

या घटनेची नोंद वाकड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३२४ (धोकादायक हत्यारांनी इजा करणे), ५०४ (शांतता भंगासाठी अपमान करणे), ३४ (सामुहिक गुन्हा) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक २ रियान मोईन खान आणि आरोपी क्रमांक ३ मोहम्मद सिराज शहा यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस तपास सुरू असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

PCMC मध्ये १२ वी पाससाठी मोठी भरती! महिला आणि मुलींसाठी सुवर्णसंधी – २०१ जागांसाठी अर्ज करा!

Jobs: इंटरनॅशनल सिक्युरिटी कंपन्यांमध्ये सुवर्णसंधी: पोलिसांपेक्षा जास्त पगार

2024 मध्ये 12वी पास महिलांसाठी सरकारी नोकऱ्या

Leave a Comment